
अमळनेर– अमळनेर तालुका सीड पेस्टिसाइड फर्टिलाइजर असोसिएशनच्या सदस्यांसाठी अमळनेर तालुका कृषी विभागातर्फे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनानुसार एकदिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती अशोक आधार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
तालुक्यातील सर्व उपस्थित कृषी सेवा केंद्र चालकांना ऑनलाइन बि- बियाणे विक्री साथी पोर्टल बाबत पीपीटी द्वारे संजय देवरे कृषी क्षेत्रीय अधिकारी महाबीज जळगाव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच साथी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी विकास बोरसे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कृषी मोहीम अधिकारी अविनाश खैरनार यांनी साथी पोर्टलवर बियाणे विक्री बाबत असोसिएशनच्या सदस्यांना सखोल मार्गदर्शन केले. या एकदिवसीय प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी होते.
सदर प्रशिक्षणास अमळनेर तालुका सीड पेस्टिसाइड फर्टिलाइजर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पवार व सचिव प्रदीप पारेख यासह अनेक कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन गुण नियंत्रक अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले.तर सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.




