
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुमुदिनी विनोद पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील सरपंचाचा ठरवलेला कार्यकाळ पूर्ण होऊन त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त सरपंचपदी कुमुदिनी पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्या एस यु पाटील यांच्या सुनबाई आहेत. याप्रसंगी बाजारसमिती संचालक समाधान धनगर, माजी सरपंच सुनील पाटील, माजी सरपंच पायल पाटील, माजी सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंच आलेश धनगर, ज्येष्ठ नागरिक नारायण आप्पा व सर्व ग्रामपंचायत सदस्य, दिनेश पाटील, प्रा. नितीन पाटील, शरद पाटील, अनिल धनगर, शामराव पाटील, निलेश पाटील, परमेश्वर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी नूतन सरपंचांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.




