
अमळनेर : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अमळनेर शहर अध्यक्षपदी नरेश दामोदर कांबळे तर तालुकाध्यक्षापदी अरुण मोरे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे होते.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रवक्ते पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, जिल्हा युवा अध्यक्ष दिपक अनुष्ठान, जिल्हा सचिव लक्ष्मण महाले, जिल्हा संघटक धनराज मोरे, दिलीप वाघ धरणगाव, दयाराम मोरे पारोळा, प्रदीप वाघ चाळीसगाव, देविदास बोरसे हजर होते. सभेत नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.
अमळनेर शहराध्यक्ष – नरेश दामोदर कांबळे, उपाध्यक्ष -गणेश दामू जाधव, सचिव – सुनिल नारायण मोरे. अमळनेर तालुकाध्यक्ष -अरूण पुंडलिक मोरे शिरुड, उपाध्यक्ष -प्रविण संभाजी वाघ मठगव्हाण , निवृत्ती पुंजू बागूल गडखांब, सचिव- सागर नथ्यू मोरे पातोंडा, युवा तालुकाध्यक्ष – रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष -विनोद जाधव , सचिव – रविंद्र साळुंखे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. प्रास्ताविक व सुत्रसंचलन विजय बि-हाडे व आभार दंगलदास सोनवणे यांनी मानले.




