
अमळनेर : महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उपविभागीय कार्यालयात १५ रोजी लोकशाही दिन संपन्न झाला.
लोकशाही दिनाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे , टी एच नेमाडे , सी जी वाघ , कुणाल सोनार , डॉ संदेश वाटोरे, जे बी पाटील , मुख्याधिकारी तुषार नेरकर, विजय गांगुर्डे , डॉ गिरीश गोसावी , एस बी गावित , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , निवासी नायब तहसीलदार सी यु पाटील, डी डी पाटील , गटविकास अधिकारी एन आर पाटील हजर होते.
यावेळी डांगरी येथील तक्रारदार रत्नाबाई निंबा पाटील यांनी सामायिक बांध फोडून पावसाचे पाणी सोडण्याबाबत तक्रार केली. ही बाब अर्धन्यायिक असल्याने अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १४५ प्रमाणे अपील करण्याच्या सूचना देऊन अर्ज निकाली काढण्यात आला.




