
अमळनेर – तालुक्यातील शहापूर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालयातील 14वर्षाखालील विद्यार्थीनींनी तालुका स्तरीय खो खो क्रीडा स्पर्धैत अजिंक्यस्पद मिळविले असून या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे . शाळेचे मुख्याध्यापक आनंदा के . धनगर सर , शिक्षक , व कर्मचारी वृंद , ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थानी विजेत्या विद्यार्थीनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन कौतुक करून भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




