
रक्तदानाचे महाअभियान,तेरापंथ युवक परिषदेचे आयोजन
अमळनेर-येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी मेगा ब्लड डोनेशन ड्राइव्ह तथा रक्तदानाचे महाअभियानाचे आयोजन तेरापंथ युवक परिषद व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान अमृत महोत्सव 2.0 निमित्ताने युगप्रधान आचार्य श्री महाश्रमण जी व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतभर हे अभियान राबविले जात असून अमळनेर येथे रोटरी हॉल,डी आर कन्या शाळेसमोर सकाळी 9 वाजता हे अभियान होणार आहे.यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना आयोजकांकडून पाणी जार भेट देण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त रक्तदात्यांनी या महा अभियानात सहभागी होऊन स्वइच्छेने रक्तदान करावे असे आवाहन आयोजक तेरापंथ युवक परिषद अमळनेर तसेच संयोजक श्री ओसवाल जैन संघातर्फे घेवरचंद कोठारी,सुभाष ओसवाल,अमळनेर जैन सोशल ग्रुपतर्फे सौरभ जैन,प्रिंतेश जैन,अमळनेररोटरी क्लबतर्फे देवेंद्र कोठारी,आशिष चौधरी,भारतीय जैन संघटनेतर्फे रोहित सिंघवी,प्रतिक जैन व न्यू प्लॉट परिसर विकास मंचतर्फे चेतन राजपूत व बिपीन पाटील यांनी केले आहे.




