
अमळनेर :- इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच एलोपॅथी डॉक्टरांनी १८ रोजी पुकारलेल्या एक दिवसीय संपाचा रुग्णांना फटका बसला असून काही ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचे हाल झाल्याचे पहायला मिळाले.

५ सप्टेंबर २०२५ रोजी राज्य शासन व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल यांच्या माध्यमातून बीएचएमएस – सीडीएमपी डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल च्या रजिस्टर मध्ये नोंदणी करण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. याच अधिसूचनेचा निषेध म्हणून आय. एम.ए. व इतर संघटना यांनी हा एक दिवसीय संप पुकारलेला होता.यामुळे दवाखान्यातील बाह्य रुग्ण तपासणी बंद होती.काही पॅथॉलॉजी देखील बंद असल्याने रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल पहायला मिळाले.
केवळ एका वर्ष कालावधीच्या फार्माकॉलॉजी अभ्यासक्रमाचा तोकडा अभ्यास करून एम बी बी एस,एम डी,एम एस,एमसीएच डी एम व डी एन बी डॉक्टरांच्या कौन्सिल मध्ये नोंदणी करणे ऍलोपॅथी डॉक्टर तसेच रुग्णांसाठी धोकेदायक असल्याचे मत आय.एम.ए. च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने ही अधिसूचना मागे न घेतल्यास बेमुदत सेवा बंद चा इशारा संघटनेने दिला आहे.




