
महिलांनी प्रथमच केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान
अमळनेर– येथे दिनांक 18 सप्टेंबर रोजी जायन्ट्स सप्ताह अंतर्गत रक्तदान महाअभियानाचे आयोजन जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली तर्फे करण्यात आले होते.या रक्तदानाच्या महाअभियानात 44 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

सकाळी दहा वाजेपासून हे अभियान सुरू झाले.प्रारंभी जेष्ठ पत्रकार संजय पाटील व किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,आर जे पाटील यासह मान्यवर उपस्थित होते.विशेष म्हणजे अनेक महिलांनी न डगमगता प्रथमच स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून हा महान कार्यास हातभार लावला. रक्तसंगलन अमळनेर येथील जीवनश्री ब्लड बँक येथील योगेश महाले व त्यांचे स्टाफने केले. दुपारी तीन वाजेपर्यंत हे अभियान सुरू होते, सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी धी प्रताप कुमार व्यायाम शाळा मित्र मंडळाचे आकाश परदेशी, भूषण लोहार,राहुल अहिरे भावेश व सुमित पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.सदर दिवशी 52 महिलांची शुगर तपासणी तसेच सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अपेक्षा पवार यांनी व आभार प्रदर्शन ग्रुपच्या अध्यक्षा दिपीका सोनवणे यांनी केले.
सदर कार्यक्रमास ग्रुपच्या उपाध्यक्ष सुदर्शना पाटील व शोभा पाटील, सचिव कल्पना पाटील,संचालक मंडळातील दर्शना गुरव,योगिता पांडे,राजश्री पाटील,पूजा पाटील व ज्ञानेश्री पाटील उपस्थित होत्या.




