
अमळनेर : राष्ट्रनेता यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांच्या जयंतीपर्यंतचा सेवा पंधरवाडा उपक्रमातून महिला सक्षम होतील. महिला सक्षम असेल तर परिवार सक्षम होतो. आपण या पंधरवाड्यात एक पेड माँ के नाम लावावे , आणि सर्वांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घ्यावी असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात लाभार्थ्यांना लाभ वाटप प्रसंगी केले.

महसूल विभाग , नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या आवारात महाराजस्व शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ९८९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
यावेळी नवीन शिधा पत्रिका , डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना , उत्पन्न , राष्ट्रीयत्व , रहिवासी , जातीचे क्साखले वाटप करून आधार नोंदणी व दुरुस्त करण्यात आली , प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेनंतरंगत दोन इलेक्टरीक मोटारी , नवीन घरकुलना मंजुरी तसेच घरकुल पूर्ण झालेल्यांना किल्ली वाटप , आयुष्यमान भारत कार्ड , बचत गटांना कर्ज , पीपीई किट , पालिकेच्या देखील घरकुल वाटप , उमेद अभियान अंतर्गत कर्ज , घरकुल साठी शासकीय जमीन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ , भैरवी पलांडे , डॉ अनिल शिंदे , ऍड व्ही आर पाटील , माजी उपसभापती भिकेश पाटील , माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , भारती सोनवणे , प्रफुल्ल पाटील ,सुरेश पाटील ,महेंद्र पाटील , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , गटविकास अधिकारी एन आर पाटील , निवासी नायब तहसीलदार सी यु पाटील , प्रशांत धमके , अजय कुलकर्णी , राजेंद्र ढोले ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी , हेमलता पाटील , वजाताई भिल , रेखाताई पाटील ,संदीप पाटील ,जिजाबराव पाटील , राहुल पाटील ,राकेश पाटील , विजय राजपूत आदी हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार रुपेशकुमार सुराणा ,सूत्रसंचालन संजय पाटील व आभार नायब तहसीलदार प्रशांत धमके यांनी मानले.




