
अमळनेर – तालुक्यातील कळमसरे सह परिसरात पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे परिणामी अनेक शेतकऱ्यांचे गुरे दगावण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे.

तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, खेडी, वासरे, निम, तांदळी, मारवड या गावांमधील पशुधन लंपी आजाराने ग्रासले असून शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गाई म्हशी बैल अगदी लहान वासरू देखील या आजारापासून सुटू शकलेले नाही. मारवड, कळमसरे व पाडळसरे येथील काही शेतकरी बांधवांचे लंपीमुळे बैल, गाय व वासरू दगावले असुन गावात सद्यस्थितीत काही जनावरे गंभीर स्वरूपात आजारी पडले आहेत. यामुळे लाखों रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून तात्काळ पशुधनावर लसीकरण करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.लंपी मुळे मृत पावलेल्या पशुधनाचा योग्य तो मोबदला म्हणून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.




