
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील ग्रामपंचायतीच्या नविन बांधलेल्या ईमारतीचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनिल पाटील म्हणाले की,निंभोरा गावाने माझ्या राजकारणाच्या सुरवाती पासून भरपूर प्रेम दिले साथ दिली त्यामुळे या गावाच्या विकासासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील,बाजार समिती संचालक समाधान धनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास एल. टी. पाटील, शत्रुघ्न पाटील, सर्जेराव पाटील, चंद्रकांत पाटील,प्रवीण पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी सरपंच कुमिदिनी पाटील उपसरपंच आलेश धनगर, पायल पाटील, चंद्रकला पाटील, कविता कोळी,जितेंद्र वाडेकर,दिनेश पाटील, अनिल धनगर,मल्हार राव धनगर, दिलीप पाटील, दिनेश धनगर, समाधान पाटील ,निलेश पाटील ,ऋषीं पारधी, अनुप धनगर ,श्रावण पाटील ,निंबा धनगर यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील आभार विनोद पाटील यांनी मानले.




