
अमळनेर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “सेवा पंधरवाडा” उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपळे येथे विशेष कार्यक्रम वृक्षारोपण व जलपूजनाचा खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला.

या वेळी मार्गदर्शन करताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, महिला सक्षम असेल तर परिवार सक्षम होतो. म्हणून राष्ट्रनेता यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांच्या जयंतीपर्यंतचा सेवा पंधरवाडा उपक्रमात एक पेड मा के नाम लावावे, आणि सर्वांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची जास्त जास्त करावा, पर्यावरण संवर्धनासोबतच जलसंपदा जतनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमास भैरवी पलांडे, डॉ. अनिल शिंदे, निंबा दला चौधरी माजी शेतकी संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील माजी उपसभापती भिकेश पाटील, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास अधिकारी हेमलता पाटील, वजाताई भिल, रेखाताई पाटील,जिजाबराव पाटील, भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते, पिंपळे बुद्रुक चे माजी सरपंच योगेश अशोक पाटील स्थानिक ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा पाटील व सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील धरती माता महिला शेतकरी गट आदी तिन्ही गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप पाटील यांनी मानले




