
अमळनेर– शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवासाठी अमळनेर नगरी सज्ज झाली आहे आज घरोघरी विधिवत घट स्थापना करण्यात येणार आहे.
शहरासह ग्रामीण भागात 86 सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आणि विविध देवींच्या मंदिरात आदिशक्तीचा जागर करण्यात येणार आहे.

घटस्थापना ही शुभमुहूर्तावर केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिला घरात घटाची स्थापना करतात. त्यासाठी महिलांनी अनेक विधी सामुग्रीची खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.




