
अमळनेर : गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात जातीय तणाव निर्माण करणारे व दंगल घडवणाऱ्या ८१ जणांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रस्तावानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी अमळनेर तालुक्यातून हद्दपार केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात जातीय तणाव वाढत चालला असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जातीय दंगलीत सहभागी अशा ८३ जणांचा नवरात्र व सणाच्या काळात हद्दपारीचा प्रस्ताव भारतीय न्याय संहिता कलम १६३(२) प्रमाणे डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे पाठवला होता. यावर कविता नेरकर यांनी ८३ पैकी ८१ जणांना २२ रोजी मध्यरात्रीपासून ते ३ ऑक्टोबर पर्यंत तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
हद्दपारीचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यामार्फत संबंधितांना देण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त जर कोणी गावात दिसला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल तसेच यापुढे गावात दंगा करणाऱ्या किंवा समाज विघातक काम करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. – दत्तात्रय निकम , पोलीस निरीक्षक अमळनेर




