
अमळनेर -येथील दि अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी बँकेच्या सभागृहात होणार आहे.

बँकेचे या आधीचे चेअरमन व व्हा चेअरमन यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर दोन्ही पदे रिक्त झाली होती.अखेर सहकार विभागाने नूतन चेअरमन निवड करण्यास परवानगी दिल्याने आज 23 रोजी सहाय्यक निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत सदर निवड होणार असून याआधी झालेल्या पार्टी मिटिंगमध्ये चेअरमन पदासाठी भरतकुमार ललवाणी व व्हा चेअरमन पदासाठी लक्ष्मण महाजन यांचे नाव निश्चित झाले असल्याचे समजते.
दरम्यान सदर निवडीनंतर सत्कार समारंभ बँकेच्या आवारात पार पडणार आहे.

