
शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गटाकडून उमेदवार चाचपणीला सुरुवात…
अमळनेर-आगामी नगरपरिषद निवडणूकीत महायुती सोबतच अमळनेरवर प्रेम करणाऱ्या लोकांना आपण जोडणार असून येणारी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपण सर्व मिळुन जिंकणार आहोत.या निवडणुकीत जो कुणी इच्छुक असेल त्यांनी आपली नावे लोकांमधून येऊ द्यावीत अशी अपेक्षा व प्रतिपादन माजी मंत्री तथा
आ.अनिल भाईदास पाटील यांनी बैठकीत केले.

आगामी नगरपरिषदेची निवडणुक महायुती अथवा महायुती प्रणित आघाडीच्या माध्यमातून लढवावी का? याबाबत इच्छुक उमेदवार व इतर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन आमदार पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.सदर बैठकीत माजी आमदारांच्या गटातील काही माजी आमदार व प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे आमदार पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.सदर बैठकीत असंख्य माजी नगरसेवक व सर्वपक्षीय कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते.जवळपास सर्वच जणांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला.व सक्षम नेतृत्व असल्याने कोणत्याही परिस्थितीत आपलाच झेंडा फडकेल असा विश्वास सर्वांनीच व्यक्त केला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले की सदर बैठक म्हणजे चाचपणी असून यानंतर भाजप असेल,राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल प्रत्येक पक्षाची स्वतंत्र बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.यात अमळनेर वर प्रेम करणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्यांना देखील सोबत घ्यावे ही आमची सर्वांची भूमिका आहे.आपल्या उमेदवारांनी आतापासूनच कामाला लागावे,खासदार स्मिताताई वाघ व माजी आमदार साहेबराब पाटील यांच्याशीही मी चर्चा करणार असून सर्व प्रमुख लोकांशीही चर्चा होणार आहे.मात्र आपण ताकदीने लढू हे नक्की आहे.आता बऱ्याच कांड्या उठतील,पण लक्ष देऊ नका.आपल्याकडे पालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुक आहेत.पण आपल्याला भवनेने निवडणूक लढवायची नसुन,उमेदवाराची स्वतःची ताकद असलीच पाहिजे.तसेच उमेदवाराची डबल भूमिका नकोच आहे.या अन्यथा उमेदवारी निश्चित करताना त्यांचा विचार कुठेही होणार नाही. उमेदवाराने आपल्याला प्रभागाचा अभ्यास आहे का हे स्वतः तपासले पाहिजे.नसेल तर उभे राहू नका,मी स्वतः मुलाखती घेणार आहे.इच्छा असावी पण त्याबरोबरच स्वतःला तापसलेही पाहिजे.आपले नाव लोकांमधून येऊ द्या,आम्हीही तसे सर्व्हे करणार आहोत.गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व्हे मध्ये अर्धा टक्के मत नसेलेले लोकही आमदारकीसाठी इच्छुक होते तसे व्हायला नको.तुम्हाला तोंडावर सगळे हो सांगतील पण सर्वांवर विश्वास ठेवू नका,आपले मत पब्लिक मधून येऊ द्या,सर्व जाती धर्माना सोबत घेण्याची आपली भूमिका असावी.तसेच निवडून आल्यावर बदलू नका आणि आतातरी बाहेरच्या लोकांनी कितीही दिशाभूल केली तरी बळी पडू नका असे आवर्जून सांगितले.तसेच आपल्या अमळनेर चा माणूस तीच आपली जात व धर्म असून गेल्या काळात संघर्ष आपण सर्व मिळून केला आहे. पुढील संघर्ष टाळण्यासाठी तालुका म्हणून एकत्र यावे लागेल.पुढील काळात विकासाचे खुप व्हिजन आपल्या समोर आहेत.
ज्यांनी ज्यांनी प्रामाणिक काम केले असेल त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे. अनुभवाची मोठी शिदोरी आपल्यासोबत नसल्याने काळजी नसावी आपली जनता आणि आपली ताकद तोच आपला विजय आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सदर बैठकीत माजी मनोज पाटील, विक्रांत पाटील,प्रताप शिंपी,नरेंद्र संदानशिव,सलीम टोपी,निलेश भांडारकर,चेतन राजपूत,राजू फाफोरेकर,बाळा पवार,शितल देशमुख,कैलास पाटील,सोमचंद संदानशिव यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.
यांचा झाला प्रवेश
सदर बैठकीत माजी आमदारांच्या गटाचे माजी नगरसेवक सलीम शेख(टोपी),फिरोज मिस्तरी,ऍड सुरेश सोनवणे,नावेद शेख,नितेश लोहरे,इम्रान हाजी कादर शेख तसेच मुकेश शिवदास बिऱ्हाडे यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.सदर प्रवेशामुळे माजी आमदारांच्या गटाला ऐन निवडणूकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला असून आमदार अनिल पाटील यांची ताकद मात्र वाढली आहे.
सदर बैठकीत माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील,माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते,विनोद लंबोळे,माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव,गोपी कासार,हेमंत पवार,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,संजय कौतीक पाटील,पराग श्याम पाटील, मेजर यादव,अरुण कदम,सचिन बाळू पाटील, संतोष पाटील,दीपक पवार,देवेंद्र कांबळे,पप्पू कलोसे,कैलास नामदेव पाटील,भरत ललवाणी,हरीश वाधवाणी,भास्कर पारधी,संजय पारधी,हिम्मत पारधी,गोकुळ पाटील,विजय वानखेडे,अमर पाटील, फयाज पठाण,संतोष लोहरे,मुजफ्फर भंगारवाले,आबीद शेख, तुषार संदानशिव,जितू मराठे,विक्की पानसे,महेश सातपुते,दीपक पाटील,संजू पाटील,विवेक पाटील,ऍड यज्ञेश्वर पाटील,पंकज साळी,जे पी पाटील,महेंद्र पाटील,संजय मराठे,गोपी कासार,सूरज परदेशी,अमित जैन,पिंटू चौधरी,संजय भिला पाटील,विजय कहारु,नितीन निळे,विजय सुकडू पाटील,संजय भिल,आरिफ पठाण,गुलाब अवचित पाटील,इम्रान खाटीक,प्रवीण बारकू महाजन,शेखा मिस्तरी, भाईदास महाजन,संजय हिम्मत महाजन,बाळू पाटील,रामकृष्ण पाटील,तुळशीराम हटकर,दिलीप ठेकेदार, कैलास पाटील,भावेश जैन,उमेश वाल्हे,भूषण भदाणे, शरद पाटील,गौरव महाजन,शांताराम महाजन,राजू प्रकाश महाजन, बापू झुलाल पाटील, प्रा दिनेश शेलकर,बबलू पाटील यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




