
अमळनेर:- भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.उदय भानू चिब जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी, अजयजी छिकारा, सहप्रभारी शांभवीजी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज जी मोरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांतजी ओगले यांच्या सूचनेप्रमाणे व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीपरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे समन्वयक तथा प्रदेश महासचिव अंकुश जी देशमुख, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव किरण पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तुषार संदानशिव,जळगाव काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वरजी कोळी, जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस ची बैठक पार पडली.

या बैठकीत ‘वोट चोर गद्दी छोड’ नारा देऊन मत चोरीच्या विरोधात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत जास्तीत जास्त युवकांना संधी देऊन युवकांना न्याय मिळवुन देईल असा विश्वास युवकांना जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिला. तर मत चोरी च्या मुद्द्यावर लोक विश्वास ठेवत असुन त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन युवकांनी जनजागृती करावी अशा सुचना दिल्या.यावेळी किरण पाटील, तुषार संदानशिव, महेश दगडु पाटील, सुदर्शन इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सूत्रसंचालन सलमान तडवी यांनी तर गोविंद देशमुख यांनी आभार मांडले. बैठकीनंतर मत चोरीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीमेला जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी स्वाक्षरी करून सुरुवात केली त्यानंतर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फुले मार्केट परिसरातील जळगाव शहरातील भूमिपुत्रांच्या दुकानांमध्ये जाऊन मतचोरी बद्दल असलेल्या शंका कुशंकांचे निराकरण करून जनजागृती केली.
यावेळी जळगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सलमान तडवी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य शुभम शिंदे , पंकज आधार पाटील, रावेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष असद सय्यद, पाचोरा विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, भुसावळ विधानसभा अध्यक्ष सुदर्शन इंगळे, रावेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष माजीत तडवी, बोदवड तालुका अध्यक्ष लखन पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष धनंजय शिंदे, भडगाव शहराध्यक्ष गोविंद देशमुख, वरणगाव शहराध्यक्ष अमोल देशमुख,चोपडा तालुकाउपाध्यक्ष माजीत तडवी,हर्षल चौधरी, गणेश ठाकरे, शरद गोसावी,कैलास शिंदे, निखील पाटील, पवन सोनार, अमन शेख, शाहीद पिंजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




