
सत्कार समारंभात झाला शुभेच्छांचा वर्षाव
अमळनेर -दी अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या चेअरमनपदी भरतकुमार सुरेश ललवाणी तर व्हा.चेअरमनपदी लक्ष्मण पांडुरंग महाजन यांची बिनविरोध निवड काल दिनांक 23 रोजी करण्यात आली.सदर निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभात झाला मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

बँकेचे या आधीचे चेअरमन व व्हा चेअरमन यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर दोन्ही पदे रिक्त झाली होती.सहकार विभागाने नूतन चेअरमन निवड करण्यास परवानगी दिल्यानंतर काल 23 रोजी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक कुणाल सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सदर निवड झाली.भरतकुमार ललवाणी यांच्या सूचना मोहन सातपुते यांनी मांडली त्यास दीपक साळी यांनी अनुमोदन दिले तर लक्ष्मण महाजन यांच्या नावाची सूचना प्रवीण पाटील यांनी मांडली त्यास पंडित चौधरी यांनी अनुमोदन दिले.निवड जाहीर होताच बाहेर हितचिंतकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.तर संचालक मंडळाने दोघांचा सत्कार केला.सदर सभेत संचालक मंडळातील प्रविण रामलाल जैन,पंकज गोविंद मुंदडे, प्रदिप कुंदनलाल अग्रवाल,दिपक छबुलाल साळी,अभिषेक विनोद पाटील,प्रविण श्रीराम पाटील, पंडित रामचंद्र चौधरी, रणजित भास्कर शिंदे, मोहन बाळाजी सातपुते, वसुंधरा दशरथ लांडगे, डॉ. मनीषा विवेकानंद लाठी,तज्ञ संचालक अॅड. व्ही आर पाटील, अॅड. विजय जगन्नाथ बोरसे,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत रामभाऊ पाटील उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान सदर निवडीनंतर बँकेच्या आवारात सत्कार समारंभ पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील,माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, ऍड ललिता पाटील,ओमप्रकाश मुंदडा,सरजू गोकलानी,प्रविण पाटील,खा शी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक, संचालक हरी भिका वाणी, डॉ अनिल शिंदे,कल्याण पाटील,योगेश मुंदडा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बांधव राजकीय पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व बँकेचे हितचिंतक व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.सर्वानी नूतन पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
भरतकुमार ललवाणी दुसऱ्यांदा चेअरमनपदी
नूतन चेअरमन भरतकुमार ललवाणी हे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा बँकेचे माजी चेअरमन स्व.सुरेशशेठ ललवाणी यांचे सुपूत्र असून माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय टिल्लूमल सेठ ललवाणी यांचे नातू आहेत. भरतकुमार हे स्वतः तिसऱ्यांदा बँकेत भरघोस मतांनी निवडून आले असून राजकीय क्षेत्रात तरुणाई मध्ये विशेष क्रेज त्यांची आहे.सामाजिक व धार्मिक कार्यात ते सक्रिय असतात मनाने सुस्वभावी असले तरी धाडसी व्यक्तिमत्व देखील ते आहेत.यापूर्वी बँकेचे चेअरमन पदी विराजमान असताना वडील सुरेश ललवाणी यांच्या प्रमाणेच बँक हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.त्यांच्या काळात बँकेचा एनपीए कमी होऊन विक्रमी नफा बँकेला झाला होता.तसेच ग्राहकांना एटीएम कार्ड त्यांच्या काळातच उपलब्ध झाले होते.याव्यतिरिक्त अनेक महत्वपूर्ण व चांगले निर्णय त्यांनी घेतल्याने त्यांची कारकीर्द उज्वल ठरली होती.आताही बँक व ग्राहक हितासाठी उत्तम कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून लवकरच बँकेचे एटीएम मशीन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.तसेच व्हा चेअरमनपदी विराजमान झालेले लक्ष्मण महाजन व्यापार क्षेत्रात असून माळी समाजाचे तरुण तडफदार धडाडीचे कार्यकर्ते ते आहेत.माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन यांचे ते सुपुत्र असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य त्यांचे आहे.




