
अमळनेर : शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ बोरी नदीच्या पात्रात एक ६० ते ६५ वयाचा इसम मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना २४ रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली.

नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांनी पोलीस स्टेशनला हेडकॉन्स्टेबल संतोष पवार याना कळवल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे आणि हेडकॉन्स्टेबल विनोद भोई तात्काळ पोहचले त्यांनी पंचनामा करून त्याचे शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद घेण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.




