
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पंधरवाड्याचा निमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात २६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

26 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड ता.अमळनेर येथे स्वस्थ नारी सशक्त परीवार अभियान सेवा पंधरवडय़ात आरोग्य तपासणी महाशिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील,यांच्या हस्ते धन्वंतरी मातेचे पुजन करुन करण्यात आले. यावेळी ॲड.व्ही.आर.पाटील, डॉ संजय रनाळकर, धारचे माजी सरपंच वसंत काटे, माजी उपसरपंच अलिम मुजावर, उमाकांत पाटील, दिलीप चव्हाण, भाजपचे पदाधिकारी राहुल पाटील, शिवाजी राजपुत, सरपंच उषाबाई भिल, उपसरपंच भिकन पाटील, श्रीमती रजनी गुरव, योगेश बडगुजर आदी उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रा.आ.केंद्र परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. महिलांची आरोग्य तपासणी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर जयेश शिंदे यांनी करुन महिलांना औषधोपचार करण्यात आले. बालकांची आरोग्य तपासणी बालरोग तज्ञ डॉक्टर आशिष पाटील यांनी करुन बालकांना औषधोपचार करण्यात आले. 30 वर्षावरील स्ञी व पुरुष यांची असंसर्ग रोगाबाबत आरोग्य तपासणी डॉक्टर प्रशांत शिंदे,प्रमोद महाजन यांनी करून रुग्णांना औषधोपचार करण्यात आले.
महिला व पुरुष यांची आरोग्य तपासणी डॉक्टरांनी करुन आवश्यक असलेली रक्त चाचणी महालॅब प्रयोग शाळा अमळनेर तसेच हिवताप व एड्स आजारा बाबत रक्त चाचणी प्रा.आ.केंद्र मारवड येथील प्रयोग शाळेत करण्यात आली. 30 वर्षावरील स्त्री व पुरुष यांचे डोळे तपासणी डॉक्टर आरक आरव यांनी करुन मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची निवड करण्यात आली तसेच औषधोपचार करण्यात आला. रुग्णांना सर्व प्रकारचे आजारांवर औषधोपचार औषध निर्माण अधिकारी यांच्या सहभागातून देण्यात आला. महाशिबीरास नाशिक विभाग स्तरावरील, जिल्हास्तरीय व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी,मार्गदर्शन करून समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार सदर शिबिर डॉक्टर साहील चौधरी व डॉक्टर विद्या देवरे यांच्या नियोजनांतून महाआरोग्य तपासणी शिबीर पार पडले. आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका प्रा.आ.केंद्र मारवड ता.अमळनेर यांनी सहकार्य केले.महाआरोग्य तपासणी शिबीर यशस्वितेसाठी आरोग्य वर्धिनी स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,गट प्रर्वतक, आशा सेविका,परीचर,ड्रायव्हर, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.




