
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथे किरकोळ कारणावरून महिलेच्या कानात विट टाकून जखमी केल्याची घटना २३ रोजी घडली असून ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील दहिवद येथे फिर्यादी हिराबाई प्रकाश पाटील व त्यांची नणंद सिंधुबाई बाप रामदास पाटील ओट्यावर गप्पा करत असताना काहीही कारण नसतांना घरासमोर राहणारे हरिदास पाटील, स्विटी पाटील व गुलाब पाटील हे तिघे तिथे आले.यापैकी हरिदास पाटील यांनी विट उचलून फिर्यादी महिलेच्या कानावर मारली.सोबतच स्विटी पाटील हिने काठीने महिलेच्या पायावर व पाठीवर व गुलाब पाटील यांनी काठीने फिर्यादी महिलेच्या पती प्रकाश पाटील याला देखील मारहाण केली.आमच्या नादी लागले तर सोडणार नाही अशी धमकी यावेळी त्यांनी दिली.महिलेला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथे हलविण्यात आले. तीन दिवस दवाखाण्यात उपचार घेतल्यानन्तर आल्यावर तिघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.




