
अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी, डोक्याला मार लागल्याने पत्नी मयत….
अमळनेर : सती माता मंदिरावरून परत येताना गाय आडवी आल्याने मोटरसायकलची धडक लागल्याने मोटरसायकलस्वार जखमी होऊन त्याची पत्नी मयत झाल्याची घटना ३० रोजी दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी टाकरखेडा रस्त्यावर बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामसमोर घडली.

मधुकर नारायण ठाकरे रा आर के नगर हा त्याची पत्नीला घेऊन मोटरसायकल क्रमांक एम एच १९ , डी एन ८५१४ हिच्यावर सती मातेच्या दर्शनाला घेऊन गेला होता. परत येताना गाय आडवी आल्याने मोटरसायकलचा वेग नियंत्रित न झाल्याने धडक लागली आणि मोटरसायकल खाली पडून मधुकर ची पत्नी मंगलाबाई हिच्या डोक्याला मार लागला. तर मधुकर पाटील याच्या तोंडाला मार लागला आहे. मधुकर पाटील यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तर महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




