
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथील नवभारत माध्यमिक विद्यालयात पंचक्रोशीतील मुलींसाठी माजी विद्यार्थी पोलीस अधिकारी राहुल देशमुख यांच्या तर्फे सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी बर्निंग मशीन लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम देखील करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शुद्ध व थंड पाण्याचे आर ओ मशीन बसवण्यात आले आहे.

मुलींच्या मासिक समस्या अनेकदा त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आणतात. त्यांना असुरक्षित वाटते. त्यामुळे शालेय मुलींसह दहिवद पंचक्रोशीतील सर्व मुलींसाठी सॅनिटरी पॅड आणि मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून दहिवद चे रहिवासी बाळासाहेब पवार , व कुसुम पवार या दाम्पत्याने ताशी १०० लिटर पाणी शुद्ध व थंड करणारे आर ओ मशीन मोफत बसवून दिले.
उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मीनाताई पाटील , हिराबाई अशोक धुळकर , संगीता वैद्य , प्रतिभा परदेशी , मयुरी शिंदे ,चेअरमन सुभाष पाटील , व्हॉ चेअरमन भबुता महाजन , , मुख्याध्यापक आसाराम सैंदाणे यांच्यासह ग्रामस्थ व संचालक मंडळ हजर होते




