
अमळनेर : तालुक्यातील सारबेटे येथील घरकुलावरून झालेल्या वादात दुसऱ्या गटाच्या चार जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोजखान शफीकखान मेवाती यांनी फिर्याद दिली की , २ रोजी सायंकाळी ६ वाजता मोबाईल रिचार्ज व आईस्क्रीमच्या दुकानावर हजर असतांना भाऊ मोहसीनखान , वडील शाफिकखान हे बैलगाडीबर घरी जात असताना त्यांच्यासोबत गावातील साबिरखान वाहेदखान मेवाती , सादिकखान वाहेदखान मेवाती , इरफानखान वाहेदखान मेवाती , रफिकखान वाहेदखान मेवाती हे वाद घालत होते. रस्त्यात असलेली चार चाकी काढण्यावरून वाद होऊन साबीरखान याने मोहसीन ला खाली उतरवून आडवे पाडले आणि इरफान याने लोखंडी सळई आणि रफीकखान याने लाकडी काठीने हातावर ,पाठीवर ,डोक्यावर मारहाण केली. हे भांडण आवरायला फिरोजखान गेला असता त्यालाही चौघानी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जखमी मोहसिन याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि त्यांनंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दिल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.

