
अमळनेर :- शहरातील विद्या विहार कॉलनीतील ठाकरे व्हिला ते मुंदडा नगर -१ गेट हा रस्ता अवजड वाहनांमुळे गुडघ्या बरोबर खचला असून वाहन चालविणे अवघड झाले आहे.
पावसाळ्यापूर्वी विद्या विहार कॉलनी ते मुंदडा नगर गेट -१ भागात पाईप लाईनचे काम करण्यात आले होते. या दरम्यान या रस्त्यावर खडी टाकून रस्ता वापरण्यासाठी सुरळीत केला होता. मात्र सद्यस्थितीत मुंदडा नगर -१ गेट जवळ ऐंशी फुटी रस्त्याचे काम सुरु असल्याने या रस्त्यासाठी खडी, सिमेंट आदी साहित्य या रस्त्यावरून आणले जात असल्याने अवजड वाहनाचा वापर सतत सुरु असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुडघ्याबरोबर खड्डे पडले आहेत. यामुळे शाळकरी मुलांना याचा खूप त्रास होत असून पाऊस झाल्यास या रस्त्यावरून पायी चालणे कठीण आहे. गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्याची अशीच अवस्था असूनही याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. ऐंशी फुटी रस्त्याच्या ठेकेदाराने तूर्त या खड्ड्यात खडी टाकून रस्त्याची सपाटी करावी. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने दुचाकी वाहन चालविणे अशक्य होत असल्याने नाईलाजाने लोकांनी या रस्त्यावरून वापर बंद केला असला तरी कॉलनी वासियांना याचा मोठा त्रास होत आहे. ऐंशी फुटी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी या रस्त्याचे तूर्त काम करावे अशी मागणी कॉलनी वासि्यांनी केली असून जबाबदार अधिकारी यांनी लक्ष घालावे.




