
भावी नगरसेवकांच्या तयारीला वेग, तर काहींची झाली निराशा…
अमळनेर : नगरपरिषदेच्या १८ प्रभागांचे आरक्षण सोडत बुधवारी नगरपालिका सभागृहात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.
प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग १(अ) सर्वसाधारण (महिला), १(ब)सर्वसाधारण , २(अ) अनुसूचित जाती ,२(ब) सर्वसाधारण महिला (महिला राखीव) , ३(अ) अनुसूचित जमाती (महिला राखीव) ,३(ब) सर्वसाधारण , ४(अ) अनुसूचित जाती (महिला राखीव), ४(ब) सर्वसाधारण , ५(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ,५(ब) सर्वसाधारण(महिला), ६(अ) अनुसूचित जाती (महिला), ६(ब) सर्वसाधारण , ७(अ) नामाप्र(महिला) , ७(ब) सर्वसाधारण , ८(अ) नामाप्र ,८(ब) सर्वसाधारण (महिला) , ९(अ) सर्वसाधारण (महिला) ,९(ब ) सर्वसाधारण , १०(अ) नामाप्र ,१०(अ) नामाप्र , १०(ब) सर्वसाधारण (महिला) , ११(अ) नामाप्र(महिला) ,११(ब) सर्वसाधारण , १२(अ) नामाप्र (महिला), १२(ब) सर्वसाधारण , १३(अ) नामाप्र (महिला), १३(ब) सर्वसाधारण , १४(अ) सर्वसाधारण(महिला ), १४(ब) सर्वसाधारण , १५(अ) नामाप्र , १५(ब) सर्वसाधारण (महिला) , १६(अ) नामाप्र ,१६(ब) सर्वसाधारण महिला,१७(अ) नामाप्र (महिला) ,१७(ब) सर्वसाधारण , १८(अ) अनुसूचित जमाती ,१८(ब) सर्वसाधारण (महिला)
सदरचे आरक्षण अमळनेर शहराची २०११ ची लोकसंख्या ९५ हजार ९९४ अशी ग्राह्य धरून प्रभाग निहाय उतरत्या क्रमाने काढण्यात आले आहे. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या ७ हजार २४५ व अनुसूचित जमाती ६ हजार १३६ अशी आहे.
आरक्षण सोडतीसाठी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण , अभियंता डिगंबर वाघ , सुनील पाटील , विनोद पाटील , कुणाल महाले , मयूर तोंडे , संजय पाटील , सौरभ बागड , अजित लांडे , विजय बागुल , मनोज सोनार , मिलिंद चौधरी ,अविनाश बोरसे , प्रमोद लटपटे , संदीप पाटील यांनी सहकार्य केले.
वजिहा निहाल अहमद , मोहमंद साद इम्रान खान , अफ्फान रईस अहमद , जरबीन फातेमा इम्रान , आयत फातेमा मोहम्मद मुश्ताक या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणाची सोडत काढण्यात आली.




