
अमळनेर :- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या घटनेचा अमळनेर वकील संघातर्फे ८ रोजी निषेध नोंदविण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ ७ रोजी वकील संघाची सभा आयोजित करण्यात आली.यात सर्वानुमते ८ रोजी वकील संघाने न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेण्याचा ठराव पारित केला.त्यामुळे ८ रोजी वकील संघाने कामकाजात सहभाग घेतला नाही.न्यायव्यवस्था व संविधानाच्या मूल्यांवर झालेला हा हल्ला असून याचा त्यांनी जोरदार निषेध केला.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किरण पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.




