
अमळनेर:- येथील श्री तानाजी महाराज मठ पैलाड येथे दि. 9 ऑक्टोबर रोजी श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्ट जळगाव अंतर्गत अमळनेर,चोपडा,धरणागाव,पारोळा आणि एरंडोल तालुका वारकरी समिती सदस्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली असून,या बैठकीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांचे संघटन व्हावं,वारकरी संप्रदायातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात,आणि गाव पातळीवर वारकर्यांचे मजबूत संघटन तयार करून प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन निर्मिती, वारकर्यांच्या समस्यांचे निराकरण, वारकर्यांना आपत्कालीन सहायता, निष्ठावान वारकर्यांचा गौरव इ.विषयांवर विचार विनीमय करावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याचे अध्यक्ष गौप्रेमी गजाननजी वरसाडेकर यांनी सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील मान्यवर ज्येष्ठ कीर्तनकारांचे मार्गदर्शन लाभणार असून वारकर्यांच्या शंका समाधानासाठी विशेष सत्राचे आयोजन केले आहे. सदर बैठकीची पूर्वतयारी हभप महंत प्रा.डाॅ.सुशील महाराज विटनेरकर आणि त्यांचे सहकारी व शिष्यपरिवार यांनी केली असून निमंत्रित वारकर्यांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन केले आहे.




