
अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे केले असून अनेक शेतकऱ्यांचे नाव असुन सुध्दा शासनाकडून अद्याप अनुदान मिळालेले नाही.
सदर पंचनामा यादीला एक वर्ष उलटून देखील अद्याप अनुदान शेतकन्यांच्या खात्यावर आलेले नाही. त्यात यावर्षी देखील पावसामुळे भरपुर प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे तत्काळ याबाबत कार्यवाही करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी
माजी शेतकी संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील, माजी सरपंच योगेश अशोक पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज दगा पाटील,पुरुषोत्तम लोटन चौधरी ,भिमराव नारायण पाटील,गोकुळ चुडामण पाटील,संतोष बापु चौधरी आदी उपस्थित होते.




