
अमळनेर:- शहरातील बसस्थानक भागातील गांधीनगर अतिक्रमण बाबत मनाई हुकूम, जैसे थे आदेश मिळवण्यासाठी ऍड सलीम खान यांनी ३६ अतिक्रमण धारकांसाठी जिल्हा न्यायालयात केलेले अपील न्या लक्ष्मण गायकवाड यांनी फेटाळून डिसमिस केले आहे. नगरपरिषदेतर्फे ऍड किरण पाटील यांनी युक्तिवाद केला होता. यामुळे नगरपरिषदेचा अतिक्रमणाचा मलबा, घरांचा राडा, निरुपयोगी साहित्य हटवण्याचा मार्ग मोकळा झाला. गांधीनगर रस्त्यातील सर्व दगड ,विटा माती हटवण्यात आले आहे. अतिक्रमण धारकांना पालिका म्हाडा कॉलनीत घरे देण्यास तयार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.




