
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील १७ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लाऊन पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसात दिली आहे.
शेतीच्या कामासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या कुटुंबातील १७ वर्षीय मुलगी ९ रोजी पहाटेपासून दिसून आली नाही. गाव परिसरात शोध घेतला असता तिचा कोणताही तपास न लागल्याने कोणीतरी फूस लाऊन पळवून नेल्याची खात्री झाल्याने मुलीच्या आईने मारवड पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास हेकॉ सुनील पाटील करीत आहेत.




