
अमळनेर:- तालुक्यातील लोण सिम येथे बखळ क्षेत्रावरून वाद झाल्याने तिघांनी एकाला मारहाण केल्याची घटना ८ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महेश अर्जुन पाटील यांनी गावातील रवींद्र रामदास पाटील यांच्याकडून २०१२ मध्ये बखळ क्षेत्र विकत घेतले होते. मात्र त्यानंतर रवींद्र पाटील यांचा मुलगा लोकांना माझ्या वडिलांना दारू पाजून बखळ क्षेत्र विकत घेतले असे लोकांना सांगत आहे अशी माहिती फिर्यादीला मिळाली. ८ रोजी रात्री ९ वाजता फिर्यादी महेश याने रवींद्र पाटील यांना जाब विचारला असता त्याचा राग आल्याने रवींद्र रामदास पाटील, व त्याचा मोठा मुलगा शुभम रवींद्र पाटील याने महेश याला लाकडी दांडक्याने मारायला सुरुवात केली व तुषार रवींद्र पाटील याने लोखंडी दांडक्याने मारहाण केली. गावातील लोकांनी येऊन महेश याची सोडवणूक करत त्याला दवाखान्यात दाखल केले. उपचार घेऊन त्याने मारवड पोलिस ठाणे गाठत तिघा बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोहेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.




