
अमळनेर :खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर संस्थेच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा शनिवारी, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचा नवा अध्याय लिहित मंडळाने अनेक उपक्रमशील प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यात श्री. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसीची विस्तारीत इमारत, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीची अत्याधुनिक संगणक लॅब, प्रताप महाविद्यालयातील सुसज्ज सेमिनार हॉल तसेच पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संगणक लॅबचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य), संजय सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. श्रीमती स्मिता वाघ (खासदार, जळगाव लोकसभा), तसेच अनिल पाटील (माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार, अमळनेर विधानसभा) उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून अनुप अग्रवाल (आमदार, धुळे शहर), सत्यजीत तांबे (आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य), डॉ. बी. एस. पाटील (माजी आमदार, अमळनेर), आणि शिरीष चौधरी (माजी आमदार, अमळनेर) यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान ना. गिरीश महाजन, ना. संजय सावकारे, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील या मान्यवरांनी खानदेश शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करत, ग्रामीण भागात आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी उपस्थित नेत्याकडून भाषणात राजकीय टोलेबाजी ही करण्यात आली.
याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, सदस्य डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, विनोद पाटील, कल्याण पाटील, चिटणीस प्रा. पराग पाटील, प्र. प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. एस. सोनवणे, प्राचार्य, प्राचार्य वर्षा पाठक, रवींद्र माळी, माजी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्रा. डी. व्ही. भलकार, विनोद पाटील, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ.विजय मांटे, डॉ. मुकेश भोळे, सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, आजी-माजी विद्यार्थी, पालक, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून फार्मसीचे चेअरमन योगेश मुंदडे यांनी खान्देश शिक्षण मंडळाचा विकास कामांचा इतिहास, वारसा आणि भविष्यातील वाटचाल अधोरेखित केली. संस्थेचे कार्योपाध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे आभार मानले तर सूत्रसंचालन डॉ. रमेश माने व डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.




