
अमळनेर : येथील धार रस्त्यावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक इसमाचे कुजलेले प्रेत आढळून आल्याचा प्रकार १३ रोजी सायंकाळी उघडकीस आला.
साधारणतः चार ते पाच दिवसांपूर्वी चिन्मय हॉटेलच्या पुढे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या शेताजवळ एक ३२ वर्षीय इसमाने लोखंडी नावाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम त्यांचे सहकारी तसेच फॉरेन्सिक पथकाने भेट दिली. प्रेत कुजलेल्या अवस्थेत होते. मयत इसमाच्या अंगावर फक्त निळ्या रंगाची पॅन्ट होती. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटल्यास अमळनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक निकम यांनी केले आहे.




