
अमळनेर:- तालुक्यातील वावडे व पाडसे शिवारातील शेतातून एकूण १५६० मीटर इलेक्ट्रिक तारांची चोरी केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कळमसरे विद्युत कक्षातील वरिष्ठ तंत्रज्ञ जगदीश शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ ते १२ ऑक्टोबर दरम्यान पाडसे शिवारातून १०२० मीटर लांबीची तसेच वावडे शिवारातील ५४० मीटर लांबीची अशी एकूण ५५ हजार किमतीची अल्युमिनियम धातूची विद्युत तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सफौ संजय पाटील हे करीत आहेत.




