
इच्छुकांच्या तयारीला वेग, तर काहीच्या आशेवर फिरले पाणी…
अमळनेर : तालुक्यातील पंचायत समितीच्या दहा गणापैकी पातोंडा अनुसूचित जाती महिला , कळमसरे अनुसूचित जमाती महिला, डांगरी अनुसूचित जमाती असे राखीव निघाले आहेत तर अमळगाव नामाप्र आणि मांडळ नामाप्र महिला आरक्षित निघाले आहे.
पंचायत समिती गणांचे आरक्षण अमळनेर येथील नपा सभागृहात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. तालुक्यात ग्रामीण भागात १ लाख ९१ हजार ८५५ मतदार आहेत. त्यापैकी १४ हजार ५०३ मतदार अनुसूचित जाती व ३५ हजार ७४७ मतदार अनुसूचित जमातीचे आहेत. मतदार संघ प्रमाणे जात निहाय लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यांनतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षण विराट शुभम शिंदे यां या बालकच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यात गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
पातोंडा (अनुसूचित जाती महिला),कळमसरे (अनुसूचित जमाती महिला),डांगरी (अनुसूचित जमाती), जानवे (सर्वसाधारण),दहिवद(सर्वसाधारण ) ,अमळगाव (नामाप्र ),मांडळ ( नामाप्र महिला),मंगरूळ (सर्वसाधारण महिला),मुडी (सर्वसाधारण महिला),सारबेटे बु (सर्वसाधारण )
सोडत काढतेवेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार प्रशांत धमके, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, प्रदीप महाले, किशोर साळुंखे, रुपाली अडकमोल, अक्षय सातपुते यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद गटांचेही आरक्षण जाहीर…
पातोंडा ( नामाप्र महिला), दहिवद (नामाप्र महिला), मांडळ (खुला महिला), कळमसरे (खुला), जानवे (खुला)




