
अमळनेर : मागाहून ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जखमी झाल्याची घटना १७ रोजी ७:४५ वाजता घडली.
चंद्रकांत मोतीराम पाटील रा सद्गुरूनगर ढेकू रोड हे त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच १९, डिव्ही १२२४ हिच्यावर मुलीला प्रताप कॉलेजला सोडून परत येत असताना भद्रा प्रतीक मॉल जवळ ट्रक क्रमांक एम एच १८ बी झेड २८८७ हिच्या चालकाने भरधाव वेगाने हयगय न करता चालवत धडक दिल्याने चंद्रकांत पाटील खाली पडून त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना उपचारासाठी श्री ऍक्सिडन्त हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. जखमी चे भाऊ नंदकुमार मोतीराम पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रक चालकविरुद्ध भारतीय न्याय संहिता २८१, १२५(अ), १२५(ब), मोटरवाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.




