
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र.डा. येथे येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात संपन्न झालेल्या गौमाता यात्रेनिमित्त बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील यांच्या पत्नी योगिता अशोक पाटील यांनी भेट दिली. या प्रसंगी गावात धार्मिक आणि सामाजिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या यात्रेच्या प्रसंगी मूडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच गावातील मान्यवर, महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी योगिता पाटील यांचे जिलेबी तुला करून सन्मानपूर्वक स्वागत केले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. योगिता अशोक पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून, अशोक पाटील यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि लोकसंपर्कामुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता, योगिता पाटील यांच्या अधिक मजबूत होत आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.




