
अमळनेर:- तालुक्यातील रडावण राजोरे येथील लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब वाल्मीक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) तर्फे सारबेटे गणातून पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसंपर्कात निपुण असलेल्या भैय्यासाहेब पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे राबवून गावाचा चेहरा बदलला आहे. गावात नवीन ग्रामपंचायत कार्यालय, विठ्ठल मंदिराचे सभामंडप बांधकाम, दलीत वस्ती काँक्रीटीकरण, शेत शिवार रस्ते, स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण याच्यासह अनेक विकासकामांचा ओघ आणला आहे. भैय्यासाहेब पाटील यांच्या पाठीशी राजकारणातील चांगला अनुभव असून वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा ही आहे. आमदार अनिल पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या भैय्यासाहेब पाटील यांचा गणात मोठा लोकसंपर्क असल्याने त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की, भैय्यासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास जनतेचा ठाम पाठिंबा आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे त्यांचा विजय निश्चित होईल. सारबेटे गणातील राजकीय समीकरणांमध्ये भैय्यासाहेब पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.




