
आता लक्ष आमदार अनिल पाटील यांच्या निर्णयाकडे…
अमळनेर:- तालुक्यात माननीय आमदार अनिलदादा पाटील व माजी जि.प.सदस्या सौ जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने खुल्या गटातील अनेक नवतरुणांना राजकीय वर्तुळातील प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.
मग अश्या स्थितीत या गटातील तरुणाईकडून आमदार अनिल पाटील यांचे सुपुत्र गौतम भाऊ यांना उमेदवारी देण्याचा मोठ्या प्रमाणात आग्रह होत आहे. गौतम पाटील हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर असून अमेरिकेतून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मायदेशी परतून सद्यस्थितीत आपल्या परिवाराचा कन्स्ट्रक्शनचा बिझिनेस अतिशय उत्तमरित्या सांभाळत आहेत. अतिशय हुशार, सुस्वभावी, सामाजिक विचारसरणी, काहीतरी नवीन घडविण्याची उमेद असे अनेक गुण गौतम पाटील अंगी असल्याने या तरुण व्यक्तीमत्वाने कळमसरे जि.प. गटातून राजकीय श्रीगणेशा करावा असा प्रचंड आग्रह गावागावातील तरुणाईकडून होऊ लागला आहे. तरुणाई आग्रही असली तरी खरेतर आमदार अनिलंदादा काय निर्णय घेतात, दिवाळीत आपल्या सुपुत्राचे फटाके ते वाजवितात का? याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
गौतम पाटील यांना संधी देण्याचा युवा पदाधिकाऱ्यांचा आग्रह…
राजकारणात तरुणाईला संधी मिळणे स्वागतार्ह असून उच्चशिक्षित व राजकीय वारसा असलेल्या गौतम पाटील यांना आमदारांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात संधी द्यावी, ह्या संधीचे आम्ही युवा कार्यकर्ते सोने करून दाखवू असे प्रतिपादन मारवड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण सुनील साळुंखे याने केले आहे.





