
अमळनेर :- तालुक्यातील पिंपळे खु. येथील शेतकऱ्याची शेतातून बैलांची जोडी व गाय चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. गाव परिसरात गुरे चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सुकदेव अर्जुन पाटील यांची बैलजोडी व सुकदेव बाबुराव पाटील गाय चोरीला गेल्याची घटना १८ रोजी रात्री घडली आहे. चोरी करून चोर जवखेडा मार्गे गेल्याचे जवखेडा गेले असल्याची शक्यता आहे. जवखेडा गावात दत्त मंदिर परिसरात जे सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहेत. त्यात २ वाजून ३ मिनिटांनी चोरटे बैलजोडी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




