
अमळनेर :- समाजातील काही कुटुंबांपर्यंत अजूनही दिवाळीच्या या प्रकाशाचा उजेड पोहोचलेला नाही. त्या चेहऱ्यांवर आनंद फुलविण्याच्या भावनेतून लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वाजता पिंपळे रोडवरील सुंदरनगरच्या पुढे, शासकीय आयटीआय जवळील वस्तीत दिवाळीच्या प्रसंगी फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी लायन्स सुनील चौधरी यांनी आपल्या पत्नी कै. भाग्यश्री सुनील चौधरी यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ योगदान दिले, तसेच लायन्स येझडी भरुचा यांनी या उपक्रमास आर्थिक सहकार्य करून समाजसेवेचे दातृत्व जपले.
या कार्यक्रमास लायन्स क्लब अमळनेरचे अध्यक्ष लायन डॉ. संदीप जोशी, सचिव लायन महेंद्र पाटील, खजिनदार लायन नितीन विनचुरकर, प्रोजेक्ट चेअरमन लायन चेतन जैन व लायन प्रशांत सिंघवी, लीनेस अध्यक्षा डॉ. मयुरी जोशी, तसेच योगेश मुंदडा, शेखर धनगर, एझदी भरुचा, प्रदीप जैन, विनोद अग्रवाल, महेश पवार, सुशील जैन, राजेश न्हाडा, दिलीप गांधी, पंकज मुंदडा, दिनेश मणियार, शामशेठ गोकलानी, अनिल रायसोनी, प्रा. जयेश गुजराथी, हरिओम सोनी,प्रितेश पारख,यांच्यासह अनेक लायन्स सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुलांना व महिलांना फराळ, मिठाई आणि गिफ्ट्सचे वाटप करण्यात आले. वस्तीतील रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सर्व उपस्थितांसाठी खऱ्या दिवाळीचा अनुभव ठरला.




