
अमळनेर : येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची पदोन्नतीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी २० रोजी आदेश काढून रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना केली आहे.
नितीनकुमार मुंडावरे हे कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात कोणतेही दाखले प्रलंबित नव्हते. विविध प्रकरणाची सुनावणी देखील जलद गतीने होऊन योग्य न्याय दिला आहे. प्रशासकीय कामकाजात त्यांचा वचक होता. त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.




