
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन…
अमळनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरळीत रस्ता नसलेल्या तांबेपुरा ,सानेनगर भागाला व दहा खेड्याना जाण्यासाठी नवीन दोन कोटींचा काँक्रीट रस्ता होणार असून नुकतेच आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील तांबेपुरा ,सानेनगर भागात जाण्यासाठी विप्रो कम्पनी जवळील रेल्वे बोगद्यातून जाणारा एकमेव रस्ता होता. रेल्वेच्या नियमानुसार हा रस्ता वाहतुकीसाठी नाही हा नाला आहे असा फलकही याठिकाणी लावण्यात आला आहे. त्यामुळे कायद्याने हा रस्ताच नाही. आणि बोगदा पाण्याचा निचरा होण्यासाठी आहे. तरीही स्वातंत्र्यपूर्व काळापासून याच बोगद्यातून या परिसरातील तसेच नंदगाव ,लडगाव, अंतुर्ली ,रंजाणे , मुडी , करणखेडे , खापरखेडे ,अंबारे आदी गावांचे लोक वापरत आहेत. पावसाळ्यात हा बोगदा पाण्याने भरल्यामुळे याठिकाणी नाल्याची घाण व कचरा साचत होता. सुरुवातीला विद्युत लाईन नसल्याने पाऊस सुरू असताना पुलावरून पायी व सायकलीने जाता येत होते. नन्तर विद्युत लाईन सुरू झाल्याने तेही बंद झाले. बोगदा खालून उंच केल्याने थोडी समस्या मिटली मात्र मोठी वाहने आणि बस कायमची बंद झाली. जगप्रसिद्ध विप्रो कंपनीच्या अमळनेर येथील मदर युनिट मध्ये येणारी मोठी वाहने देखील जाऊ शकत नाहीत. वाहतुकीची कोंडी होते. एकच लहान वाहन या बोगद्यातून जाते. आणि जास्त पाऊस पडल्यास अजूनही पाणी साचते.
आमदार अनिल पाटील यांनी या रस्त्याला पर्याय म्हणून सुरळीत रस्ता प्रताप कॉलेज कडून मारवड रस्ता ते तांबेपुरा असा सुमारे दोन कोटी रुपयांचा रस्ता मंजूर केला. नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर विप्रो कंपनीत मोठी वाहने येण्यासाठी , तांबेपुरा आणि सानेनगर आणि इतर दहा खेड्याना जाण्यासाठी सुरळीत रस्ता मिळणार असल्याने नागरिकांनी आमदार अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी बंगालिफाईल भागातील नागरिकांसाठी शुद्ध आणि थंड पाण्याच्या मशीन सुरू केले. त्याचेही उदघाटन करण्यात आले. हे पाणी नागरिकांसाठी वाहनाने मोफत घरपोच दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष भागवत पाटील ,रिटा बाविस्कर , मुक्तार खाटीक , सचिन पाटील , गोविंदा बाविस्कर ,नरेंद्र चौधरी ,राजेंद्र यादव, कैलास पाटील ,प्रवीण पाटील ,देवेंद्र कांबळे , रणजित शिंदे , जितेंद्र ठाकूर , अलका पवार , अरुण संदानशीव ,सलीम टोपी ,नरेंद्र संदानशीव तांबेपुरा ,सानेनगर, बंगाली फाईल ,अयोध्या नगर परिसरातील नागरिक हजर होते.




