
स्वामीनारायण संप्रदाय भक्तीचा महासागर-आ.अनिल पाटील
अमळनेर:- स्वामीनारायण संप्रदाय म्हणजे भक्तीचा महासागर असून संपूर्ण विश्वात त्यांचे भक्तगण आहेत. अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिराच्या माध्यमातून बालक व युवांना संस्कार व व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात तर महिला व पुरुषांना मानवता व भक्तीचामार्ग दाखविण्याचे कौतुकास्पद कार्य होत असल्याची भावना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
शहरातील स्टेशन रोडवरील स्वामी नारायण मंदिरात दिवाळीनिमित्त भक्तीमय वातावरणात काल 23 रोजी भव्य -दिव्य उत्सव अन्नकुट साजरा करण्यात आला.यावेळी आमदार पाटील यांच्यासह लायन्स क्लब अध्यक्ष डॉ संदीप जोशी,बजरंगलाल अग्रवाल,हरी भिका वाणी, योगेश मुंदडा,नीरज अग्रवाल,गौतम अनिल पाटील,पंकज मुंदडा यासह मान्यवर उपस्थित होते.विश्ववंदनीय परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने भारतीय परंपरेनुसार अविभाज्य भाग असलेला हा अन्नकूट उत्सव साजरा झाला. या उत्सवामध्ये भगवान स्वामीनारायण, अक्षर ब्रह्म स्वामी, गुनितानंद स्वामी, घनश्याम महाराज, राधाकृष्ण आदी देव परंपरा विविध पदार्थांनी सजल्या होत्या. यामध्ये विविध प्रकारच्या स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी मिठाई, फरसाण, भाज्या, ज्यूस भगवंताला अर्पण करण्यात आले होते.या निमित्त मंदिराला विविध प्रकारची रोषणाई करण्यात आली होती. सुरवातीला धून, प्रार्थना,थाक- भजन सादर झाले. मंदिराचे संत पूज्य योगीस्नेह स्वामी,पूज्य अखंडमुनी स्वामी यांच्या प्रमूख यांच्या प्रमुख उपस्थितीत भजन सादर झाल्यानंतर उपस्थित संत आणि मान्यवरांच्या हस्ते भगवंताची आरती झाली.असंख्य महिला व पुरुष भाविक या मंगलमय अन्नकूट दर्शन व भक्तीच्या सोहळ्यात सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. आरतीनंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा शिस्तीने लाभ घेतला.
यांची होती उपस्थिती
यावेळी पूज्य अखंडमुनी स्वामी,जगदीश चौधरी,चंद्रकांत वाणी,मारवाडी थाळ प्रितम माणियार ,चेतन चौधरी,विशाल चौधरी ,योगेश बारी यांनी विविध प्रकारचे संगितमय थाळ गाणं केले.
या कार्यक्रमात पूज्य योगिस्नेह स्वामी यांनी आमदार अनिल पाटील तर माजी आमदार शिरीष यांचा सत्कार पूज्य योगिस्नेह स्वामी एवं अखंडमुनि स्वामी यांनी केला. कार्यक्रमात जितेंद्र ठाकूर,रणजित शिंदे,प्रवीण जैन ,मुन्ना शर्मा,प्रविण पाठक,विक्रांत पाटील,चेतन राजपूत ,पंकज चौधरी ,किरण पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते आणि सुमारे जवळ पास 1100 भाविक भक्तानी महा प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल सोनी ,किशोरकुमार सोनी ,अमरीश अग्रवाल हरिकृष्ण सोनी ,प्रितम मणियार,चंद्रकांत महाजन,चंद्रकांत वाणी,नीरज अग्रवाल,श्यामकांत बागड, जगदीश चौधरी,जितू अग्रवाल रमेश कुंभार,अमोल बाविस्कर,मनोज देशमुख,राजेश देशपांडे ,किरण लोहार,चेतन चौधरी,धिरज अग्रवाल ,रामानंद गिलडा,प्रशांत वाणी आदित्य सोनवणे,सोमनाथ दुसाने,उमेश भावसार ,रोहित बोडरे,योगेश चौधरी ,मनोज पाटील,मनोज देशमुख , प्रवीण चौधरी,योगेश मकवाना,पंकज महाजन,मनीष पाटील ,धीरज मकवाना,हर्ष मकवाना, तिलक दुसाने,एवं समस्त महिला मंडळ युवती मंडळ,युवक मंडळ पान खिडकी स्वामिनारायण मंडळ एवं समस्त स्वामिनारायण संत्संग मंडळ अमळनेर यांनी परिश्रम घेतले.




