
अमळनेर:-पौराणिक काळा पासून दीपावली या सणाला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्याला परतले होते तेव्हा त्यांच्या स्वागता साठी रयतेने सुंदर रांगोळ्या,हार तोरणे व दिप पणत्या लावून स्वागत केले होते ही हिंदू धर्माची संस्कृती पुढील पिढीने कायम जपावी म्हणून महिलांनी राम मंदिरात दिवाळी साजरी केली.
यावेळी शोभा रघुनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांनी स्वयंम स्पूर्तीने सहभाग घेतला. तरी दर वर्षी दिवाळी पहाट राममंदिरात मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी जास्तीत जास्त महीला वर्ग उपस्थित असावा तसेच मंगळ ग्रह समिती, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू, समाज सेवक सेविका यांनी सहकार्य करावे अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली .दिवाळी पहाट साठी रुपाली जोशी, प्रतिमा साळवी, वैशाली चौधरी, स्वाती पोळ, भारती कार्लेकर, सोनाली साळुंखे, दिव्या बडगुजर, नंदा गायकवाड, उज्वला शिरोडे आदी महिला उपस्थित होत्या. वृक्षवल्ली अध्यक्षा नीलिमा सोनकुसरे व अपेक्षा पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.




