
आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून ९० लक्ष निधीस मंजुरी…
अमळनेर:- शहरातील शिरूड नाका परिसरातील श्रीकृष्ण सॉमिल ते राजाराम नगरपर्यंतच्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील श्रीकृष्ण सॉमिल ते राजाराम नगर पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन २३ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी नगर येथील बाळासाहेब ठाकरे चौकात पार पडले. ९० लक्ष निधीतून सदर काँक्रीटीकरण होणार असून आमदार अनिल पाटील पाटील यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या पाठपुराव्याने सदर काम मंजूर झाले आहे. भुयारी गटार आणि २४/७ पाइपलाइनच्या कामामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला गेला होता. त्यामुळे वाहनधारकांची वाहन चालवताना मोठी तारांबळ उडत होती. मात्र आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून ९० लाखांच्या निधीतून रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामास मंजुरी देण्यात आली आहे. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आमदार अनिल पाटील व मान्यवरांवर परिसरातील नागरिकांकडून पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले.
सदर भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी नगरसेवक प्रताप शिंपी, जितेंद्र ठाकूर, विनोद लांबोळे, चेतन राजपूत, जीवन पवार, अरुण पाटील, शरद पाटील, विक्रांत पाटील, मुन्ना शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.




