
अमळनेर : शहरातील कासार गल्ली माळीवाडा भागात अमोल जगन्नाथ माळी (वय ४०) याने आजार पणाला कंटाळून २४ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला सुती दोरी बांधून गळफास घेतला.
त्याचा भाऊ चंद्रकांत माळी याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




