
अमळनेर : तालुक्यातील कलाली येथे ४३ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी घडली.
कलाली येथील अरुण गबा पाटील (वय ४३) यांचे आईवडील वारले असून अविवाहित असल्याने एकटाच राहत होता. व शेती करून उदरनिर्वाह करत होता. २८ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे लक्षात आल्याने आजुबाजूच्या लोकांनी त्याला खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील करीत आहेत.




