
अमळनेर : एलसीबी पोलिसांच्या तावडीतून बेडयांसह फरार झालेल्या दोन गुन्हेगारांपैकी अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरूण, जळगाव) याला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे.
गुरे चोरी प्रकरणात जळगाव येथून चार संशयितांना अमळनेर येथे आणत असताना कुऱ्हे अंडरपास बोगद्यात दोघांनी गाडी हळू झाल्याचा फायदा घेत बेडयांसह गाडीतून उडी मारून पळ काढला होता. यामुळे आरोपीना आणणाऱ्या जबाबदार चारही पोलिसांचे निलंबन झाले आहे. तांत्रिक मुद्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता त्यातील अमजद कुरेशी दिल्ली येथे आढळून आला. एलसीबी पोलिसांनी त्याला पकडून अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.




